December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

MPSC : सन २०२२ च्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

नवी मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि परीक्षा घेणाऱ्या इतर संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. या उद्देशाने विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार सन २०२२ मध्ये आयोगातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित केल्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी कळविले आहे.

शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकात स्पर्धा परिक्षांचे नाव, जाहिरातीचा दिनांक, पूर्व परीक्षेचा दिनांक, पुर्व परिक्षेच्या निकालाचा महिना, मुख्य परिक्षेचा दिनांक, मुख्य परिक्षेच्या निकालाचा महिना या सर्व बाबी सविस्तरपणे नमूद करण्यात आल्या आहेत.

https://mpsc.gov.in/# वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना किंवा दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असे बदल झाल्यास ते वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत विधीमंडळातील वारंवार झालेल्या चर्चेनुसार प्रस्तावित वेळापत्रक निश्चित करतांना कोणत्याही प‍रीक्षा एकाच दिवशी येणार नाही. याची आयोगामार्फत दक्षता घेण्यात आली आहे. संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून या संदर्भात दक्षता घेण्याची विनंती आयोगामार्फत करण्यात आली आहे.