December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

वेश्याव्यवसायातून चार महिलांची सुटका

दोन महिला एजंट पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे

महिलांना वेश्याव्यवसायात ओढणाऱ्या दोन महिला एजंट यांना ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी जेरबंद केले असून पीडित चार महिलांची त्यांच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या वागळे इस्टेट परिसरात काही महिला पिडीत असहाय्य महिलांना फुस लावत, वेश्यागमनासाठी तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाकडुन वेळोवेळी सापळे लावण्यात येत होते. परंतु कायदयातील पळवाटीचा फायदा घेवुन या महिला एजंट सापळयात अडकत नव्हत्या. ठाणे गुन्हे शाखेने महिलांविरुध्दच्या गुन्हयाची मोहीम सुरु असुन त्या अतंर्गत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षेने वागळे इस्टेट लुईसवाडी, हॉटेल मंत्रा, शहनाई हॉलचे बाजुला, अशा गजबजलेल्या सुसंस्कृत परिसरात शोध मोहीम राबवुन दोन महिला एजंट ताब्यात घेवून तिच्या तावडीतुन ०४ पिडीत महिलेची सुटका केली. त्या महिलेविरुध्द वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात विविध कलामांसह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस हवालदार श्रध्दा कदम, वालगुडे, दिवाळे, सोननीस, पांडव, पोलीस नाईक विधाते, खेडेकर, पोलीस अंमलदार रोशन कदम, खरात, पादीर, पोलीस नाईक नितीन पाटील या पथकाने केली.