December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC : १५ ते १८ वयोगटातील ६३,७७६ लसवंत

डोंबिवलीतील अस्तित्व मुलांच्या शाळेतील मुलेही लसवंत

कल्याण

केडीएमसी क्षेत्रात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली. या वयोगटातील ६३,७७६ मुले शुक्रवारपर्यंत लसवंत झाल्याने या वयोगटातील ६८ टक्के इतके लसीकरण झाले आहे.

केडीएमसी परिसरातील एकूण २३९ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात तसेच मनपाच्या लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. सोमवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागातील अस्तित्व या दिव्यांग व कर्णबधिर मुलांच्या शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगटामधील ३५ मुलांना कोवॅक्सिन लसीची पहिली मात्रा देण्यात आली. तसेच, १८ वर्षावरील १२ व्यक्तींना कोविशिल्‍ड लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील डॉ. शीतल पाटील व त्यांच्या पथकाने अस्तित्व शाळेत जाऊन दिव्यांग मुलांच्या केलेल्या या लसीकरणाबाबत अस्तित्व संस्थेच्या सचिव राधिका गुप्ते यांनी केडीएमसीचे आभार मानले.