October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

भारतीय संगीताच छत्र हरपलं…

लता दिदी यांची माझी प्रथम मेट १९९३ साली पं. हृदयनाथजी मंगेशकर यांच्या भावसरगम कार्यक्रमात भेट झाली. या कार्यक्रमामध्ये त्यांनी माझे तबला व ढोलकी वादन ऐकले. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये अमेरिका बॉस्टन येथे बृढन महाराष्ट्र मंडळ येथे झालेल्या कार्यक्रमात दिदीबरोबर तबला साथ करण्याची संधी मिळाली. तो आनंद विलक्षणीय होता. त्यानंतरच्या हिंदीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी तबला ढोलकीची साथ संगत केली.विशेष कार्यक्रम आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशेव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ‘अमृताचा घणू’ या कार्यक्रमात मी दिदींबरोबर तबल्याची साथ केली. एक असाच योग दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या हॉलमध्ये माझा तबला ऐकला आणि खुश होऊन स्टेजवर येऊन पारितोषिक दिले ते मी आशिर्वाद समजतो.विशेष म्हणजे, दिदी कार्यक्रम व रिहसलच्या निमित्त माझी जेवणाची विचारपूस करत असत. दरवर्षी गणपतीमध्ये मला दर्शनाच निमंत्रण असायचे आणि मी दरवर्षी गणपतीला जायचो. मी दिदींच्या बाबतीत एवढेच म्हणेल देवाने अनेक माणूस घडवली पण प्रत्यक्ष दिदीना देवाने घडवले अशा कालातीत व्यक्तिमत्व होत. भारतीय संगीताच छत्र हरपलं…

तबला वादक अशोक कदम

सर्व फोटो तबला वादक अशोक कदम यांच्या सौजन्याने