कल्याण
बदलापूरच्या सुरज तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ३२ गुणासह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर नवी मुंबईच्या स्पिरीट तायक्वांदो अकॅडमीने ३० गुणासह उपविजेतेपद पटकावले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ ठाणे जिल्ह्याच्यावतीने २० वी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा कल्याण पूर्व मंगल राघोनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातून १२० खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेतील सर्व सुवर्णपदक विजेते आगामी संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील असे ठाणे जिल्हा तायक्वांदो अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी सांगितले.
स्पर्धेचे अंतिम पारितोषिक वितरण कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख आणि भाजपा महिला आघाडीच्या कल्याण पूर्व अध्यक्षा प्रिया जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तायक्वांदो सचिव रोहित जाधव, उपाध्यक्ष रवींद्र गजरे, कौशिक गरवालिया, आनंद पस्टे, रॉबिन मॉन्जिनीस, प्रमोद कदम, राजेश शिंदे, विजय म्हात्रे, सुदर्शन दुधाने, स्वप्निल ओंबासे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलांमधून अविनाश राहुल, आदित्य लावंड, सागर पंडित, क्रिश भोईर, अंगद नारकर, ऋत्विक राघव, शाहिद शेख, गर्व खार, ऋषिकेश लोंलगे यांची तर, मुलींमधून गायत्री मिश्रा, साक्षी शेंडगे, अवनी नांदुरकर, लिईशा सोनवणे, स्नेहल वाघमारे, आदिती राठोड, शिमल मस्के, अनुष्का परदेशी, वंशिका रणत या खेळाडूंची निवड झाल्याची माहिती अविनाश ओंबासे यांनी दिली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर