December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Kalyan Crime : मायलेकीला चोरट्यांची मारहाण

दागिने आणि रोकड घेऊन चोरटे झाले पसार

कल्याण

आई आणि मुलीला बेदम मारहाण करुन घरातील ऐवज लुटून चोरटे फरार झाल्याची घटना कल्याणजवळील अटाळी येथे रविवारी रात्री घडली. या मायलेकींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलीस तपास करीत आहेत.

अटाळी गावात राहणाऱ्या वत्सला चिकणे यांच्या शेजाऱ्यांनी माघी गणेशाची स्थापना केली होती. त्यानिमित्ताने वत्सला यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी आली होती. रविवारी रात्री विसजर्नानंतर आई आणि मुलगी, दोन मुलांसह घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री वत्सला यांना जाग आली तेव्हा दोन जण घरात शिरले असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड सुरु करण्याआधीच त्यांच्या डोक्यावर चोरट्यांनी मारहाण केली. या आवाजाने मुलगी सारिकाही जागी झाली. सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघींना मारहाण करुन घरातील १३ तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन चोरटे पसार झाले.