December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

डॉ. कोकरे यांचा “घनकचरा नव्हे तर, धनकचरा”

डॉ. रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले शहरात कार्यरत असताना राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल आता शासनाने घेतली असून वेंगुर्ले पॅटर्नचा समावेश आता सीबीएसई अभ्यासक्रमातील मुलांच्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे.

CBSE अभ्यासक्रमात केडीएमसी अधिकाऱ्याचा धडा

कल्याण

केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी असताना वेंगुर्ला परिसरात ‘शून्य कचरा मोहिमे’बाबत भरीव काम केले. त्यांच्या या कामाची दखल सीबीएसई बोर्डाने घेतली असून इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात या विषयाबाबतच्या धड्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

कर्जत, माथेरानमध्ये डॉ. कोकरे यांनी वेंगुर्लाप्रमाणे कचरा विरहित शहर व डंपिंग ग्राउंड विकसित केले आहे. माथेरान नगरपरिषदने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एका रस्त्याला “मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे मार्ग” असे नांव दिले आहे. स्वच्छतेबाबत कमालीचे शिस्तप्रिय, सजग आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे डॉ. कोकरे यांनी आतापर्यंतच्या शासकीय सेवेत ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम बक्षीस रूपाने विविध शहरांना प्राप्त करून दिली आहे.

| वेंगुर्ले पॅटर्नचा सीबीएसई अभ्यासक्रमात समावेश

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू झाल्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, केडीएमसी क्षेत्रात कोरोना साथ ऐन भरात असतानादेखील उपायुक्त डॉ. कोकरे यांनी शून्य कचरा मोहिमेचा २० मे २०२० पासून प्रारंभ केला. कल्याण डोंबिवली परिसर कचरा मुक्त होण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

डॉ. कोकरे यांनी वेंगुर्ले शहरात कार्यरत असताना राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल आता शासनाने घेतली असून वेंगुर्ले पॅटर्नचा समावेश आता सीबीएसई अभ्यासक्रमातील मुलांच्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आल्याने, डॉ. कोकरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.