December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कल्याण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील मलंगगड परिसरातील २२ गावात युवक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी कल्याण पूर्व विधानसभेचा आढावा घेण्यात आला. ही बैठक ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कल्याण येथे पार पडली.

या बैठकीत कल्याण पूर्व विधानसभेतील बुर्दुल गावचे सरपंच सुनील पाटील यांची राष्ट्रवादी युवक ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर कल्याण पूर्व विधानसभा व अंबरनाथ तालुका ग्रामीण भागातील सुमारे ७० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.