December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

नूतन विद्यालयाचा शालेय भिंत सजावटीमध्ये सहभाग

कल्याण

पश्चिमेतील नूतन विद्यालयाने सुशोभिकरण, स्वच्छता आणि शालेय भिंत सजावटीमध्ये सहभाग घेतला आहे.

केडीएमसी आणि रोटरी क्लब कल्याण, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्ताने शहरातील शाळा, सोसायटी, बगीचा परिसरातील भिंतीवर स्वच्छता, शुन्य कचरा, पर्यावरण, प्लास्टीक मुक्ती, सर्वधर्म समभाव अशा विविध विषयांवर चित्र काढण्याचे अवाहन केडीएमसी उपायुक्त रामदास कोकरे यांनी शहरातील सर्व शाळेतील कलाशिक्षकांना केले होते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनापासून नूतन विद्यालयात ‘माझी वसुंधरा’ या विषयावर कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीवर सुंदर रेखाटन करण्यास सुरवात केली आहे.

| शाळेच्या भिंतीवर सुंदर रेखाटन करताना विद्यार्थी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे, उपायुक्त रामदास कोकरे, छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, सरचिटणीस अनिल पांचाळ, स्थानिक माजी नगरसेविका विणा जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ही आकर्षक चित्रे विद्यार्थी, पालक, शिक्षक व कल्याणकरांचा कौतुकाचा विषय झाला असून अनेकांचा सेल्फी पॉईंट झाला आहे. याठिकाणी आणखी विविध प्रकारची चित्र साकारण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका सय्यद व कलाशिक्षक पवळे यांनी सांगितले.