December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भंगार वाहनांमुळे रहिवाश्यांना होतोय त्रास

कल्याण

पश्चिमेतील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या आवारात जमा झालेल्या भंगार गाडयांमुळे व कचऱ्यामुळे परिसरात असलेल्या रहिवासी वस्तीला डासांपासून आणि घाण वासामुळे त्रास होत असून रहिवाशांची या त्रासापासून सुटका करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या शेकडो दारूच्या गाड्या अनेक वर्षापासून त्यांच्या कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये जप्त करून ठेवल्या जात आहेत. या गाड्यांचे रुपांतर सध्या भंगारात झाले आहे. त्या सर्व सडलेल्या गाडी, टायर आणि इतर वस्तूंमुळे या परीसराला डंपिंग ग्राऊंडचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या कोरोना काळात अशा प्रकारच्या घाणीच्या साम्राज्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी परिसरात अनेक प्रकारचे रोग पसरून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून उत्पादन शुल्क कार्यालयाच्या परिसरातील भंगार व कचरा त्वरित साफ करून स्वच्छता ठेवण्याची मागणी नोवेल साळवे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.