किल्ला सर करणारा सर्वात लहान गिर्यारोहक
कल्याण
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वात कठीण असा समजला जाणारा किल्ले “मोरोशीचा भैरवगड” कल्याणमधील ओम महादेव ढाकणे या ४ वर्षीय चिमुकल्याने सर करून पुन्हा एकदा कल्याण शहराच्या मुकुटात कौतुकाचा तुरा खोवला आहे. या आधी ही महाराष्ट्रातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून त्याने कल्याणचा श्री मलंगगड सर करून यशाला गवसणी घातली होती. यावेळी, त्याने त्यापुढे ही प्रयत्न वाढवून मोरोशीचा भैरवगड सर करून, हा किल्ला सर करणारा सर्वात लहान गिर्यारोहक बनण्याचा मान मिळवून कल्याण शहराचे नाव अधिक उंचावर नेले आहे.
कल्याणचा “सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर” हा संघ सह्याद्रीच्या खोऱ्यात धाडसी मोहिमा नित्यनेमाने आखत असतो आणि संघाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जमदरे, राजेश गायकर, प्रशिल अंबाडे, लतीकेश कदम आणि विकी बोरकुले आदींनी ओमला सहकार्य केले. रात्री एक वाजता मोरोशी या गावातून ट्रेकला सुरुवात झाल्यानंतर जंगलातील वाट तुडवत मोरोशीच्या भैरवगडाच्या माचीवर सुमारे ३ ला पोहचल्यानंतर तिथे थोडा आराम करून पुन्हा एकदा कड्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी सुमारे १ तासाचा ट्रेक करावा लागतो.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर