December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

युथ फेस्टिवलमध्ये एसएसटी महाविद्यालयाला घवघवीत यश

उल्हासनगर

मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या युथ फेस्टिवलमध्ये एसएसटी महाविद्यालयाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत दर वर्षी युथ फेस्टिवलचे आयोजन केले जाते. नुकतेच मुंबई विद्यापीठाचे सन २०२१-२२ या वर्षातील ५४ वे युथ फेस्टिवल पार पडले. यंदा यामध्ये लिट्रसी, नाट्य, फाईन आर्ट, संगीत आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या सपर्धांमध्ये विद्यापीठांतर्गत येत असलेल्या सर्व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यातील काही स्पर्धांमध्ये ‘एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स’ने मोठी बाजी मारलेली आहे. यातील एकूण तीन स्पर्धांमध्ये एसएसटी महाविद्यालयाने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.

वेस्टन इन्स्ट्रुमेंट सोलो या स्पर्धेत मंदार म्हात्रेने तर मेहेंदी डिझाईनमध्ये आरजू खान आणि वेस्टर्न वोकल सोलो स्पर्धेत पिलाई क्रिस्टीनाने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरुन एसएसटी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यासोबतच मिमिक्री कॉम्पिटिशनमध्ये वैभवी अहिररावने द्वितीय क्रमांकाचे आणि मोनो अक्टिंगमध्ये मनीष हटकरने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, उपप्राचार्य डॉ. खुशबू पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख तुषार वाकसे, मायरा लाच्छानी, मयूर माथुर, दीपक मुलपानी यांनी मार्गदर्शन केले.