December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

साम्राज्यची कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई

कल्याण

महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसुबाई शिखर सर करण्याचे प्रत्येक ट्रेकर्सचे स्वप्न असते. शिखर सर करताना अनुभवी ट्रेकर्सचा सुद्धा दम निघतो, पण हे अवघड आव्हान साम्राज्य मराठे ह्या पावणे दोन वर्ष वय असणाऱ्या चिमुकल्याने व आठ वर्षाच्या जान्हवी पाटील यांनी स्वीकारले.

अवघड पायवाट, धडकी भरवणाऱ्या दऱ्या, पायाला घाम फोडणाऱ्या लोखंडी शिड्या, हवेतील गारवा, सोसाट्याचा वारा ह्यावर मात करत, दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी सर्वोच्य माथ्यावरील कळसूबाईच्या मंदिराजवळ अगदी उत्साहात पोहचण्यात साम्राज्यने यश मिळवले. आणि, कळसुबाई शिखर सर करणारा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात लहान वयाचा गिर्यारोहक ठरला.

विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजित मराठे, सायली मराठे, अवधुत पाटील यांच्या प्रोत्साहनातून कळसुबाई शिखरावर चिमुकल्यांना यशस्वी चढाई करता आली. यामुळे सर्वच स्तरातून यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.

माझ्या मुलाने जो पराक्रम केला आहे तो खरंच कौतुकास्पद असून त्याच्या जिद्दीची आम्हाला कल्पना होती. पण असा मोठा पराक्रम करेल असं वाटत नव्हतं पहिल्यापासूनच त्याला विविध खेळ आणि अशा दऱ्या खोऱ्या मधून विविध छोट्या-मोठ्या ट्रॅक केल्याची प्रतिकिया इंद्रजीत यांनी दिली.