ठाणे
शहरात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये एका जखमी बगळ्यासह जिवंत घोणस जातीच्या सापाला जीवनदान मिळाले आहे. जखमी बगळ्यावर उपचार करून त्याला वन विभागाच्या तर घोणस सापाला सर्पमित्राच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास संजय पाटील (तरीचा पाडा) हे कोलशेत खाडी येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांना या परिसरात एक बगळा जखमी अवस्थेत निदर्शनास आला. त्यांनी तातडीने त्याला पकडून घरी आणून औषधोपचार केले. शुक्रवारी याबाबत ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देत, तो बगळा त्यांच्या स्वाधीन केला. आपत्ती विभागाने त्याला ब्रम्हांड येथील एस.पी.सी.ए. हॉस्पिटल येथे उपचार करुन, वन अधिकारी यांच्या ताब्यात दिला.
तर, कळवा, न्यू शिवाजी नगर, ठाकूर पाडा, येथे ठाकुर निवासच्या परिसरात सुमारे ४.५ फुटांचा एक जिवंत घोणस जातीचा साप शुक्रवारी दुपारच्या सुमारास आढळला. तातडीने सर्पमित्राला पाचारण करून त्याला पकडून त्या घोणस सापाला सर्पमित्राच्या ताब्यात देण्यात आल्याचे आपत्ती विभागाने सांगितले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर