अंबरनाथ
नवीन विद्यापीठ कायद्यातील राजकीय हस्तक्षेपाबाबत अ.भा.वि.प.ने नागरिकांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने अंबरनाथ पूर्व येथील रहिवाशांना नवीन विद्यापीठ कायदा व त्यात चाललेला राजकीय हस्तक्षेप याबद्दल माहिती देऊन अभाविप अंबरनाथ शाखेकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या अभियानात दीडशेहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी सही करून अभाविपच्या मागणीला संमती दर्शवली.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अभाविप राजकीय पक्षांना अजिबात थारा देणार नाही; आणि जोपर्यंत नवीन विद्यापीठ कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत अभाविप तीव्र आंदोलन करण्यास सुद्धा मागे हटणार नसल्याची प्रतिक्रिया श्रेया कणसे यांनी दिली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू