कल्याण
टीम परिवर्तनच्या माध्यमाने मामनोली येथील पोटगाव परिसरातील वीटभट्टीवरील कामगारांना आज ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छतेसाठी पेस्ट, ब्रश आणि साबणदेखील देण्यात आले.
साहित्य वाटपासाठी रेनिता लोपेस, सीमा आपटे, श्रुती अय्यर यांनी विशेष सहकार्य केले. यावेळीं, टीम परिवर्तनचे शोभा बोडके, तुषार वारंग, भुषण राजेशिर्के, अविनाश पाटील उपस्थित होते. टीम परिवर्तन शिक्षण, आरोग्य, क्रीडा या विषयांच्या अनुषंगाने प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागांतील वंचित समाज बांधवांसाठी सातत्याने काम करत आहे. क्रीडा क्षेत्रांत ग्रामीण भागातील युवकांना संधी मिळावी यांसाठी पुढील काळात टीम परिवर्तन काम करणार असल्याचे यावेळीं तुषार वारंग यांनी सांगितले.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू