April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

“पानिपत”कारांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण

कल्याण

सार्वजनिक वाचनालय, कल्याण या संस्थेतर्फे २०२०-२१ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठीतील ज्येष्ठ कथालेखक दि. बा. मोकाशी व कविवर्य माधवानुज यांच्या नावांचा हा पुरस्कार आहे. हे पुरस्कार ज्येष्ठ “पानिपत”कार विश्वास पाटील यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी व सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले आहे.