ठाणे
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे सध्याच्या जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट दिसू लागले आहे, जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी अवघे ९३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या या ९३ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या सात लाख सात हजार ३१६ इतकी झाली आहे तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सहा लाख ९३ हजार २०७ वर गेली आहे.
जिल्ह्यातील ठाणे महापालिका हद्दीत सोमवारी ३० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर एक जण दगावला आहे. तसेच, कल्याणमध्ये १८ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत २४, उल्हासनगरमध्ये ०३, भिवंडी ०२ मीरा-भाईंदर ०६, अंबरनाथ ०२, कुळगाव- बदलापूर ०० आणि ठाणे ग्रामीण येथे ०५ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, एकही रूग्ण न आढळलेल्या कुळगाव बदलापूरमध्ये १४ फेब्रुवारीला एक जण दगावल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५
कल्याणात रोटरी क्लबचा ‘अमृत जल’ उपक्रम