भिवंडी
वनविभागाच्या कारवाईत खैर सोलीव लाकडाचा साठा जप्त करण्यात आला असून ठाणे वनविभागातील पडघा रेंजने ही धडक कारवाई केली आहे.
पोलीस विभागाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून, सहा. वनसंरक्षक मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पडघा एस. बी. देवरे यांच्या नेतृत्वाखाली पडघा रेंज स्टाफ व स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने मौजे बोरिवली पडघा गावात एका कंपाउंडमध्ये छापा टाकून खैर सोलीव लाकडाचा माल जप्त करण्यात आला. जागेवर एक खैर सोलीव किटा मालाने भरलेला एक टेम्पो मिळाला. तो टेम्पो ताब्यात घेऊन भरलेल्या मालासह पडघा विक्री आगार येथे आणून ठेवला आहे. सुमारे ६ घनमीटर खैर सोलीव माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास चालू आहे.
या कारवाईत वनक्षेत्रपाल भिवंडी आर्देकर, वनपाल पडघा दिनेश माळी, वनपाल किरवली एस. बी. खरे, वनपाल वडपा विलास निकम, वनपाल पाच्छापूर विजय पवार, वनपाल दिघाशी श्याम चतुरे, वनरक्षक डालेपाडा कुंदन भोईर, वनरक्षक पाच्छापूर अमित कुलकर्णी, वनरक्षक दिघाशी विलास सपकाळ, वनरक्षक सांगावं अजय राठोड, वाहन चालक विकास उमटोल, वनमजुर संतोष गोडांबे यांनी सहभाग घेतला.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर