December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC Election : हरकतींवर १८ फेब्रुवारीला सुनावणी

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सुचना मागविण्यासाठी १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत एकुण ९९७ हरकती प्राप्त झाल्याची माहीती निवडणूक उप आयुक्त सुधाकर जगताप यांनी दिली आहे.

प्राप्त हरकतींवरील सुनावणी विजय वाघमारे, सचिव (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई) तथा प्राधिकृत अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीसमोर, स्थायी समिती सभागृह, महापालिका भवन, कल्याण पश्चिम येथे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून होणार असल्याची माहिती केडीएमसीच्या वतीने देण्यात आली आहे.