ठाणे
उथळसर प्रभाग समितीसमोरील मोठे झाड दोन दुकानांच्या छतावर पडल्याची घटना सोमवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये त्या दुकानांच्या छतांचे नुकसान झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
उथळसर कबरस्थान आवारात आणि जवळील दोन दुकानावर मोठे झाड पडल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन तसेच वृक्ष विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ ते झाडे हटविण्यात आले. यामध्ये मे. मारबल इंडिया शॉपच्या छताचे मोठया प्रमाणात तर मे. विकास मेटल शॉपच्या छताचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी