सुभेदार वाडा कट्टा तर्फे राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिवसाचे निमित्ताने सूर्य नमस्कारचे आयोजन पश्चिमेतील शारदा मंदिर येथे मंगळवारी, सकाळी ८ वाजता करण्यात आले होते.
यावेळी सात शाळांमधील ११६ मुले, ५० मुली आणि १५ शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता. याच वेळी सर्व शाळांमध्ये देखील सूर्य नमस्काराचे आयोजन केले होते. सर्व कार्यक्रम युट्युब व फेसबुकवर प्रसारित करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी बारा सूर्यनमस्कार ताल सुरात सुंदर पद्धतीने सादर केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भालेराव मॅडम, आर. डी. पाटील, अंकुश आहेर, कोळी सर, विनोद शेलकर ,यश महाजन, तडवी सर, अनिल मोकल व सर्व शाळेतील शिक्षकांचे स्वागत सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार वाडा कट्ट्याचे खजिनदार ए. जी. पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक जोशी, भालेराव मॅडम, आर डी. पाटील, अंकुश आहेर, कोळी सर व इतर क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्लास्टिक मुक्ती संदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी