डोंबिवली
स्केटिंग असोसिएशन कल्याण तालुका आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली रिजेन्सी ट्रॉफी स्पर्धा डोंबिवलीच्या अनंतम रेसिडेन्सी येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत ठाणे, मुंबई पालघर, रायगड येथील १८२ खेळाडू सहभागी होऊन स्पर्धाला चांगला प्रतिसाद दिला. ही स्पर्धा स्केटिंगच्या पाच विविध प्रकारांमध्ये खेळवण्यात आली. या स्पर्धेत मुंबईच्या टीम एक्स्ट्रीम या क्लबने विजेतेपद तर मीरा-भाईंदरच्या स्केट लाइफ क्लबने उपविजेतेपद पटकावले. एम. के. क्लबला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रीजन्सी ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण समारंभ रिजेन्सी ग्रुपचे डायरेक्टर राहुल भाटिचा यांच्या हस्ते करण्यात आला. तर या स्पर्धेसाठी रीजन्सी ग्रुपचे डायरेक्ट विकी रूपचंदानी यांचे सहकार्य लाभले.
काही विजेत्यांची नावे…
कियांश अग्रवाल,
तक्षी परदेशी,
सात्विक मोरया,
काशवी जोशी,
रिनेश गुप्ता,
केरा जगदाळे,
निव्ह कृष्णन,
अनिरुद्ध बागरी,
मिहिका दास,
दिवा मल्होत्रा
रुद्र पवार,
संस्कृत यमगर.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी