ठाणे
पार्क केलेल्या कारला आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौक येथे घडली. या आगीत कारचे किरकोळ नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.










Leave a Reply