Power by The Web Cloud Media

चक्क, चिखलाने रोखला मुंबई नाशिक महामार्ग

ठाणे

ठाण्यातून कल्याणच्या दिशेकडे चाललेल्या एका ट्रकमधील चिखल रस्त्यावर पडल्याने गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्ग काही मिनिटांसाठी रोखला गेला.

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्त्यावर पडलेल्या चिखलावर पाण्याचा मारा करून तो चिखल रोडच्या बाजूला केल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एका ट्रकमधून चिखल पडल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पडलेल्या चिखलाचा वाहतुकीवर परिणाम होऊ लागल्याने चिखलावरती अग्निशमन दलाच्या रेस्क्यु वाहनातील होज पाईपच्या मदतीने पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर वाहतुक पूर्वपदावर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *