अतिप्रसंगाला विरोध केल्याने केली विवाहितेची हत्या
डोंबिवली
डोंबिवलीत एका 33 वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफ्यात लपवून ठेवणाऱ्या विशाल घावट (२५) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली केली आहे. विशेष म्हणजे, एका चपलवरून तपासाची चक्र फिरवत पोलीस आरोपीपर्यत पोहोचले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुस्तक देण्याच्या बहाण्याने शिंदे यांच्या घरात शेजारील इमारतीत राहणारा विशाल शिरला. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशालला सुप्रिया यांनी प्रतिकार केला. यामुळे विशालने सुप्रिया यांची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
काय आहे घटना…
डोंबिवली पूर्वेतील दावडी गावातील ओम रेसिडन्सीमध्ये पती किशोर आणि दहा वर्षांच्य मुलासह सुप्रिया राहत होत्या. पती किशोर हा मंगळवारी सकाळच्या सुमारास कामावर गेला होता. त्यावेळी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मात्र, संध्याकाळी किशोर कामावरुन घरी आला तेव्हा सुप्रिया घरात आढळून आली नाही. त्यामुळे तिचा शोध घेत नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी रात्रीच्या सूमारास पती किशोर पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेला असता, त्याच्यासोबत विशालसुद्धा गेला होता. याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक शिंदे यांच्या घरी आले. त्यांना घरातील सोफा पाहुन संशय आला त्यांनी सोफा उघडून पाहिले असता सोफ्यात सुप्रियाचा मृतदेह आढळून आला.
चप्पलेवरून लागला शोध
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. घटनेच्या दिवशी सुप्रियाच्या घराबाहेर एक चप्पल दिसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मोबाईल ॲपद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या चपला दाखविण्यात आल्या होत्या. त्यामधील एक चप्पल ओळखून सूप्रियाच्या घराचे बाहेर असलेली चप्पल नमुद चपलेशी मिळती जुळती असल्याचे आढळून आले. अशा प्रकारची चप्पल विशाल घालत असून तो शेजाऱ्याच्या इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एका फुटेजमध्ये विशाल याच्या पायात तीच चप्पल दिसली. त्यानंतर पोलिसांनी याच माहितीवरुन संशयीत म्हणून विशालला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरु केली.
अतिप्रसंगाला विरोध केला म्हणून केली हत्या
दुपारच्या सुमारास सुप्रिया घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेवुन विशालने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला प्रतिकार करुन दरवाजाकडे जावुन आरडाओरड करण्यास सुरवात केली. यावेळी, विशालने सुप्रियाचे डोके पकडुन फरशीवर आपटण्यास सुरूवात केली. तसेच त्याचे खिशात असलेल्या नायलॉन केबल टायने सुप्रियाचा गळा आवळुन तिला ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील सोफाकम बेडमध्ये लपवुन घरातून पळ काढला होता. मात्र या हत्येचा गुन्हा केवळ चपलेमुळे उघडकीस आणण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर