April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

आकाशातील दहा आश्चर्य तुम्हाला माहित आहेत..?

दा. कृ. सोमण करणार आकाशातील दहा आश्चर्याचा उलघडा

डोंबिवली 

जमिनीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आकाशाबद्दल कमालीचे आकर्षण असते. याच कुतुहलातून विकसीत झालेल्या खगोल विज्ञानाने आकाशातील अनेक रहस्ये मानवाला समजली. रविवारी २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली येथील के. बी. विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आकाशातील निवडक दहा आश्चर्यांचा उलगडा करणार आहेत.

साहित्ययात्रा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवातील हा दुसरा कार्यक्रम आहे. त्यात दा. कृ. सोमण खगोल विज्ञानाने समजलेली आकाशातील रहस्ये सांगणार आहेत. हे विश्व कधी व कसे निर्माण झाले? सूर्य कसा आणि कधी निर्माण झाला? तो थंड कधी होणार. मग मानवाचे काय होणार? चंद्र नसता तर? चंद्र पृथ्वीवर आदळेल का? उल्कावर्षावाच्या चित्तथरारक रात्री. लघुग्रह पृथ्वीवर आदळून जीवसृष्टी नष्ट होईल असे नासा सांगते. मग तसे का घडत नाही? परग्रहावर जीवसृष्टी आहे का? एलियन्स पृथ्वीवर खरोखरच आले आहेत का?

भविष्यातील स्पेस टुरीझम कसे असेल ? आकाशातील ग्रह गोलांचा आपल्यावर परिणाम होतो का ? आदी प्रश्नांची उत्तरे दा. कृ. सोमण देतील. रविवार, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून हा कार्यक्रम रंगेल. तर २७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत पुस्तक प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

याच कार्यक्रमात दा. कृ. सोमण यांच्या हस्ते ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’ या डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ग्रंथालीच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होत असून ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलापूरकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.