April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्र आणि नाणी यांचे प्रदर्शन

अचिव्हर्स महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ न्यु कल्याणचा उपक्रम

कल्याण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अचिव्हर्स महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ न्यु कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिमेतील अचिव्हर्स महाविद्यालय येथे शिवकालीन शस्त्र आणि नाणी यांचे एकदिवसीय भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी अचिव्हर्स कॉलेजचे चेअरमन महेश भिवंडीकर, माजी नगरसेवक अरविंद मोरे, प्रतिक पेणकर, भगवान मोरे यांच्यासह महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोफिया डिसोझा, शाळा मुख्याध्यापक हनुमंत म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते.

अरविंद मोरे यांनी वीर तानाजी मालुसरे यांनी कशा प्रकारे जिद्दीने कोंढाणा किल्ला सर केला याबाबत सांगितले. प्रणय शेलार यांनी सर्व शिवकालीन शस्त्र आणि नाणी यांच्याबाबत माहिती दिली. तर ओमकार करांगळकर आणि रोहन मोरे यांनी शिवकालीन युद्धकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कविता करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. तर सिध्दी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रदर्शनाला कल्याण मधील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देत शिवकालीन शस्त्र आणि नाण्यांची माहिती घेतली.