December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ठाणेकरांना मोठा दिलासा

पुन्हा आली रुग्ण संख्या १०० च्या आत

ठाणे

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत आली असून जिल्ह्यात शनिवारी एकाच मृत्यू झाला आहे. तर दिवसभरातील सापडलेल्या ७१ रुग्ण संख्येने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तर, जिल्ह्यातील भिवंडी, कुळगाव-बदलापूर या महापालिका आणि नगरपालिका परिसरात एकही रुग्ण आढळून आल्या नसल्याची माहिती ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

       जिल्ह्यात शनिवारी सापडलेल्या ७१ रुग्ण संख्येने एकूण रुग्ण संख्या सात लाख सात हजार ७८८ इतकी झाली आहे. तर कोरोना मुक्त रुग्णांची संख्या ही सहा लाख ९४ हजार ६६७ वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ही एक हजार २११ इतकी असून जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ८६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ३० रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

केडीएमसीत ७, नवी मुंबईत २३, उल्हासनगर २, भिवंडी ०, मीरा भाईंदर २, अंबरनाथ २, कुळगाव बदलापूर ० आणि ठाणे ग्रामीण मध्ये ५ कोरोना रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे.