महाराष्ट्र संघातही निवड
ठाणे
पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनतर्फे शुक्रवारी १८ फेब्रुवारीला पार पडलेल्या ४८ व्या खुल्या राज्यस्तरीय सिनियर्स ज्युदो स्पर्धा २०२२ आणि राष्ट्रीय निवड चाचणी या स्पर्धेच्या ७८ किलो वजनी गटात, ठाण्याच्या अपूर्वा महेश पाटील हीने सुवर्ण कामगिरी केली आहे.
अपूर्वा हिने या स्पर्धेत अमरावतीच्या नियती, मुंबई येथील शांभवी कदम, आणि अंतिम सामन्यात पुण्याच्या अनिता या खेळाडूंना पराभवाची धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरले. ठाणे जिल्ह्यातून अपूर्वा या एकमेव खेळाडूची निवड, मार्च २०२२ मध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर महिला जुदो स्पर्धेकरिता, महाराष्ट्र राज्याच्या संघात झाली आहे. ती गेल्या अकरा वर्षांपासून ठाणे सरस्वती क्रीडा संकुल येथे, ज्युदोचे प्रशिक्षक देवीसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी