December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

जिल्ह्यात २५ टक्के आर.टी.ई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

२८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे आवाहन

ठाणे

जिल्ह्यात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता आर.टी.ई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पालकांनी बालकांची अर्ज नोंदणी  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या वेबसाईटवर दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण ६४८ शाळा पात्र असून इयत्ता पहिलीसाठी ११४६९ व पूर्व प्राथमिक साठी ७९८ जागा उपलब्ध आहेत.

पालकांना ही प्रवेश प्रक्रीया सुलभ होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 हे घटक प्रवेश घेऊ शकतात

 या प्रवेश प्रक्रियेत SC/ST/NT/OBC/SBC हे वंचित घटक प्रवेश घेऊ शकतात. तसेच एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या बालकांना आणि ४० टक्के दिव्यांग असणाऱ्या बालकांना आर.टी. ई च्या माध्यमातून प्रवेश घेता येतो.