April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाणेकरांनी केली पदकांची लयलूट

ठाणे

पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सुपर स्प्रिंट जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश नायट्रो संघाने आपली आगळीवेगळी छाप सोडत, तब्बल ४० पदकांची कमाई केली आहे. यामध्ये २० सुवर्ण, १९ रौप्य व ६ कांस्यपदकांचा समावेश आहे.

पुण्यातील बालगंधर्व जलतरण तलाव येथे १९ व २० फेब्रुवारी रोजी जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ७ वर्षाखालील गटामध्ये मुलांमध्ये ओजस मोरे याने ३ रौप्य व १ कांस्य, नक्ष निसार याने १ रौप्य व २ कांस्यपदके तर मुलींमध्ये माहि जांभळे हिने ५ सुवर्णपदके पटकाविली. ९ वर्षाखालील मुलांमध्ये रुद्र निसार याने १ सुवर्ण व १ रौप्य तर मुलींमध्ये निधी सामंत हिने ८ सुवर्ण १ रौप्य, फ्रेया शाह हिने १ सुवर्ण व ५ रौप्य तर श्रुती जांभळे हिने १ रौप्य पदक पटकाविले. १० वर्षाखालील गटात विराट ठक्कर याने ३ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्यपदक पटकाविले. ११ वर्षाखालील मुलींमध्ये आयुषी आखाडे हिने २ सुवर्ण व २ रौप्यपदके पटकाविली. १२ वर्षाखालील मुलांमध्ये आदित्य घाग याने २ रौप्य व १ कांस्यपदक तर १४ वर्षाखालील मुलांमध्ये सोहम साळुंखे याने १ रौप्य व १ कांस्यपदक पटकाविले. हे सर्व जलतरणपटू कैलास आखाडे, रुपेश घाग व अतुल पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे.