ठाणे
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हददीत स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरुस्ती करीता वाहतुक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. भिवडी शहरात येणाऱ्या मल्टीॲक्सेल वाहन, ट्रक, मोठे टेम्पो व मालवाहक करणारी सर्व प्रकारची मोठी चार चाकी व त्यावरील वाहने या प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणे आवश्यक असल्याने ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत खालील प्रमाणे अधिसूचना जारी केली आहे.
प्रवेश बंद :- नदीनाका (शेलारगांव) येथून भिवंडी शहरात, धामणकर नाका मार्गे अंजूर फाटाकडे जाणाऱ्या जड अवजड ट्रक, मोठे टेम्पो, आयसर ११०९ सह, डंपर, ट्रेलर, कटेनर, खाजगी बसेस, लक्झरी बसेस इ. वाहनांना बंजारपट्टी नाका व बगारपट्टी नाक्यावरील ब्रिज येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने ही बंजारपट्टी नाका व वजारपट्टी ब्रिज येथून डावे बाजूस वळण घेवून चाविंद्रा रोडने वड़पा येथून मा.क्र. ३ इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- चाविंद्रा नाका येथून भिवंडी शहरात, धामणकर नाका मार्गे अंजूर फाटाकडे जाणाऱ्या जड अवजड वाहने ट्रक, मोठे टेम्पो, आयसर ११०९ सह डंपर, ट्रेलर, कंटेनर, खाजगी बसेस, लक्झरी बसेस इ. वाहनांना चाविंदा येथेच “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने हो बाविंद्रा नाका येथेच वळून चाविंद्रा रोडने वडपा येथून रा.म.क्र. ३ मार्गाने माणकोली येथे उजवीकडे वळून इच्छित आतील.
प्रवेश बंद :- रांजणोली नाका येथून भिवडी शहरातून शेलार गांव, बाडा, मनोरकडे जाणारी जड अवजड वाहने ट्रक, मोठे ट्रक, मोठे टेंपो, आयसर ११०९ सह. डंपर ट्रेलर, कंटेनर, खाजगी बसेस, लक्झरी बसेस इ. वाहनांना रांजणोली येथेच “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने ही रांजणोली, नाक्यावरून मुंबई नाशिक महामार्गानि वडपा, चाविंद्रा, वंजारपट्टी नाका ब्रिज वरुन उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- रांजणोली नाका येथून भिवंडी शहरातून धामणकर नाका मार्गे अंजूर फाटा वसईकडे जाणारी जड अवजड वाहने, ट्रक, मोठे टेम्पो, आयसर ११०९ सह. डंपर, ट्रेलर कंटेनर खाजगी बसेस, लक्झरी बसेस इ. वाहनांना रांजणोली नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने ही रांजणोली नाक्यावरून नाशिक मुंबई महामार्गाने माणकोलो नाका येथून ब्रिजच्या खालून उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- अंजुर फाटा येथून धामणकर नाका मार्गे भिवंडी शहरातून बाडा, राजणोली नाका व कल्याणकडे जाणाऱ्या जड अवजड वाहने ट्रक, मोठे टेंमो, आयसर ११०९ सह, डंपर, ट्रेलर, कंटेनर, खाजगी बसेस, लक्झरी बसेस, इ. वाहनाना अंजूर फाटा येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने ही अंजूर फाटा येथून वळ-वळपाडा, दापोडा रोडने माणकोली नाका येथून डावीकडे वळण घेवून मुंबई-नाशिक महामार्गाने इच्छित स्थळी जातील.
वाहतुक मुभा :- नदीनाका (शेलारगाव), चाविंद्रा नाका, रांजणोली नाका तसेच अंजूर काटा येथून भिवंडी शहरात येणाऱ्या ४ व ६ चाकी ट्रक, टेम्पो व इतर हलक्या वाहनांना रात्री ००.०१ वा ते सकाळी ०५.०० वा. पावेतो वाहतुकीस मुभा देण्यात येत आहे.
प्रवेश बंद :- नदीनाका (शेलार) व चाविंद्रा येथून भिवंडी शहरात, धामणकर नाका मार्गे अंजूर फाटाकडे जाणारी तसेच नवीबस्ती, रांजणोली, कल्याणकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना स्व: राजीव गांधी उड्डाणपुलावर बागेफिरदोश येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने ही स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरून न जाता उड्डाणपुलाचे बाजूस असलेल्या रस्त्याने एस. टी. स्टैण्ड, आय.जी.एम.गेट दिघे चौक, अशोकनगर गेट नं. २, कल्याण नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- अंजूर फाटा येथून धामणकर नाका मार्गे स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरून वाडा, शिवाजी चौक, नाशिककडे तसेच रांजणोली नाका, कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहायक पोलीस आयुक्त, भिवंडी पूर्व विभाग जवळील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाचे रॅम्पचे सुरवातीस “प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- वाडा शिवाजी चौक, नाशिककडे जाणारी वाहने उड्डाणपुलावरून न जाता उड्डाणपुलाचे बाजूस असलेल्या रस्त्याने कल्याण नाका-एस. टी. स्टैण्ड-बागे फिरदोश मार्ग इच्छित स्थळी जातील. तसेच रांजणोली नाका, कल्याणकडे जाणारी सदरची वाहने उड्डाणपुलावरून न जाता उड्डाणपुलाचे बाजूस असलेल्या रस्त्याने कल्याण नाका येथे उजवीकडे वळून नवीवस्ती मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना वाडा बागेफिरदोश, छ. शिवाजी महाराज चौक, चाविंद्रानाका, नदीनाक्याकडे जाण्यासाठी स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाचा वापर न करता साईबाबा जकात नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने ही साईबाबा जकात नाका येथे स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर न चढता उड्डाणपुलाचे बाजुस असलेल्या रस्त्याने भादवड नाका – के.बी. चौकी – नवीवस्ती – नेहरूनगर – आसबिबी – कल्याण नाका येथे उजवीकडे वळण घेवून दिघे चौक – एस. टी. स्टॅण्ड, बागेफिरदोश मार्गे इच्छित स्थळी जातील.
वाहतुक मुभा :- स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरुन स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरून धामणकरनाका अंजूरफाटाकडे जाणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, हलकी वाहने, छोटे टेम्पो, कार अशा वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे.
वाहतुक मुभा :- वडपा, चाविंद्रा नाका येथून शेलारगांव, वाडा, गुजरातकडे जाणारी जड अवजड वाहने ट्रक मोठे टेम्पो, आयसर ११०९ सह, डंपर, ट्रेलर, कंटेनर, खाजगी बसेस, इ. वाहने भिवंडी शहरात न येता वंजारपट्टी ब्रिजवरून उजवीकडे वळून नदीनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
नो पार्किंग :- सदर काम करतांना वंजारपट्टी नाका ते धामणकर नाका अशी वाहतूक हळूवारपणे जाणार आहे. परंतु वाहतूक कोडी होवू नये याकरीता उड्डाणपुलाचे काम सुरू झाले पासून पुढे संपूर्ण काम होई पावेतो देवजीनगर ते नदीनाका पर्यंत रस्त्याच्या दोन्ही वाहिनीवर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहनांना पार्किंग करण्यास मनाई (नो पार्किंग झोन) करण्यात येत आहे.
सदर नमुद कामासाठी अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली होती. परंतु सदर उड्डाणपुलाचे काम पुर्ण न झाल्याने सदरची अधिसूचना ०१ फेब्रुवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत उड्डाण पुलाचे बेअरिंगस बदलण्याचे कामासाठी अपेक्षित राहील.
तसेच सध्या अवजड वाहनाच्या बंदी संदर्भात निर्गमित केलेल्या अधिसूचना अबाधित राहून सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर यापूर्वी अवजड वाहनाच्या बंदी संदर्भात निर्गमित केलेल्या अधिसूचना पूर्वी प्रमाणे अबाधित राहतील.
सदरची अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, अन्नधान्य,भाजीपाला, डिझेल, पेट्रोल, गैस, पाणी, दुध, औषधे, यांची वाहतूक करणारी वाहने, मिनी स्कूल बसेस तसेच सर्व शासकीय, निमशासकीय व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे, पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर