चार महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासन, पोलिसांनी केली होती कारवाई
कल्याण
चार महिन्यांपूर्वी १ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करीत शांतीनगर येथील गुरुदेव इंटरप्राईजेस या दुकानातून मावा जप्त केला होता. मात्र, तो जप्त केलेला मावा भेसळयुक्त नसल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाने दिला असल्याची माहिती कल्याण शिवभिम मिठाई, मावा, खवा, ट्रान्सपोर्ट, चालक, मालक, व्यापारी, कामगार संघटने पत्रकार परिषदेत दिली आहे.
१ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलिसांनी कारवाई करत मिठाई, स्पेशल बर्फी, मावा, खवा, मिल्क केक विक्री करणारे घाऊक व किरकोळ व्यापारी रवी खंडेलवाल यांच्या गुरुदेव इंटरप्रायजेस येथे छापा घालत नमुने अहवाल जप्त करून कारवाई केली होती. नकली, बनावटी, तारीख उलटलेला, भेसळयुक्त अशी अनेक प्रकारची बतावणी करत नमुने कार्यवाही पूर्वीच बदनामी करण्यात आली होती. त्याबाबतचे नमुने अहवाल प्राप्त झाले असुन हा मावा भेसळयुक्त नसल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाने दिला असल्याची माहिती संघटनेचे सचिव जयदीप सानप यांनी दिली. यावेळी संघटनेचे संस्थापक शिवसेना नेते अरविंद मोरे, संघटना अध्यक्ष आरपीआय नेते सागर पगारे, संघटना उपाध्यक्ष लखपती राजपूत, पुरुषोत्तम खंडेलवाल, व्यापारी रवी खंडेलवाल, पंकज खंडेलवाल, राजा जाधव उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त होण्याआधीच काहींनी हा भेसळयुक्त मावा असल्याची बदनामी केली होती. मात्र त्यावेळी जप्त केलेले नमुने अहवाल यात कोणतेही भेसळयुक्त, नकली, तारीख उलटलेला शरीरास अपायकारक नमुना नसून मानदे कायदे प्रमाणे प्रमाणित असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. अशा प्रकारच्या खोट्या बदनामीमुळे व्यापारी दूध खवा उत्पादक शेतकरी पशू पालक यांचे नुकसान होत असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणीही याबाबत बदनामी करू नये असे आवाहन संघटनेचे सचिव जयदीप सानप यांनी केले आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर