December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC : २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

कल्याण

दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिका क्षेत्रात सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ० ते ५ वर्षे वयोगटाखालील सुमारे १,५९,०६२ बालकांना ५४० लसीकरण केंद्रामार्फत मोफत पोलिओची लस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच दिनांक. २७ फेब्रुवारी रोजी जी बालके बुथवर पोलिओचा डोस घेण्यासाठी येऊ शकणार नाहीत. त्यांना पुढील ५ दिवसात त्यांच्या घरोघरी जाऊन लस पाजण्यात येईल. त्यासाठी एकूण ७३५ लसीकरण चमू असतील. मागील वेळेस २६ सप्टेंबर २०२१ दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत १,७१,७३० बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली आहे.

तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रीय सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा स्वानंद मिळवून संपुर्ण जगातून पोलिओचे उच्चाटन करण्यात सिंहाचा वाटा उचलून आपल्या बालकांचे संरक्षण करावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.