कल्याण
भुवनेश्वरकडून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून सुमारे साडे पाच लाख रुपये किमतीचा तब्बल ५५ किलो गांजा कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. याप्रकरणी सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली बहाद्दूर खान या तिघांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीत इगतपुरी ते कल्याण दरम्यान पेट्रोलिंग आरपीएफ जवान पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान वातानुकुलीत बी ३ बोगीतून प्रवास करणारे तीन प्रवासी आपसात भांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे आरपीएफच्या पथकाने विचारणा करत असताना या तिघांमधील एकाने सीट खाली असलेली बॅग आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. या तिघांच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहता त्यांच्यावरील संशय बळावला. यामुळेच आरपीएफच्या जवानांनी या तिघांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्या तिघांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसाच्या ताब्यात दिली. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुमारे ५ लाख ५३ हजार ९५० रुपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी या तिघांना अटक करत गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर