ठाणे
घोडबंदर रोडवरून ठाणेकडे येणाऱ्या धावत्या मोटारीला बुधवारी रात्री अकराच्या आग लागल्याची घटना गायमुख परिसरात घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, मोटारीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मोटार मालक आणि चालक सुनील हुमने हे बुधवारी रात्री घोडबंदर रोडने ठाण्याकडे येत होते. ते गायमुख वाहतुक चौकीजवळ आल्यावर अचानक त्यांच्या मोटारमधून धूर येऊ तिने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि कासारवडवली वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर