मराठी भाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन
डोंबिवली
२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवली मनसे शहर शाखेच्यावतीने “एक दौड वीर जवानांसाठी” या भव्य मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येत आहे. या दिवशी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामुळे मनसे डोंबिवली शहर शाखा आणि द रनर्स क्लॅन यांच्यावतीने ६५ किलोमीटर अंतराच्या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मरेथॉनची सुरवात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून २६ फेब्रुवारी रात्री १२ वाजता होणार असून त्यांची सांगता डोंबिवली येथील अप्पा दातार चौक येथे होणार असल्याची माहिती मनसे डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत १०० जणांनी मॅरेथॉनसाठी नाव नोंदणी केली असून यात महिलांचा देखील सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. १८ ते ६५ या वयोगटातील नागरिकांचा सहभाग असून आतापर्यंत या मरेथॉनमध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी विविध ठिकाणाहून नागरिक सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमधील आर्मी आणि पोलीस खात्यात जाण्याची इच्छा असणाऱ्या मात्र योग्य मार्गदर्शन न मिळणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा द रनर्स क्लॅन या संस्थेचा मानस आहे. यासाठी आमदार राजू पाटील यांचे सहकार्य असणार असल्याचेही यावेळी घरत यांनी सांगितले
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर