मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांचे पोलीस उपायुक्तांना पत्र
डोंबिवली
काही ज्वेलर्सकडून आकर्षक भिशी योजनेचे आमिष दाखवून कल्याण डोंबिवली परिसरातील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकारात वाढ होत असून या लुटारू ज्वेलर्सवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पोलीस उपआयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
मे. एस. कुमार गोल्ड अँड डायमंड या ज्वेलर्सने २० ते २५ ग्राहकांना सुमारे १ कोटी ५६ लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. गोल्ड स्कीमच्या गुंतवणुकीमध्ये माफक दरात सोने व डायमंड देत असल्याचे व त्याकरिता आकर्षक योजनेत गुंतवणूक करण्याचे प्रलोभन ग्राहकांना दाखवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ज्वेलर्स दुकानाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार पिल्लई विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे गुंतवणूकदार कल्याण डोंबिवलीमधील सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील असून या आर्थिक फसवणूकीमुळे ते मेटाकुटीला आले आहेत.
या व्यतिरिक्त गुडवीन ज्वेलर्स, व्हि. जी. एन. ज्वेलर्स व आता एस. कुमार ज्वेलर्स हे मोठे मोठे ज्वेलर्स करोडो रुपयांचा अपहार करून गायब झाले आहेत. या फसवणूक करणाऱ्या ज्वेलर्सवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा नाईलाजास्तव सर्व बाधीत व फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना बरोबर घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा घरत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर