उल्हासनगर
महाविद्यालयीन तरुणाईचा आवडीचा महोत्सव म्हणजे विविध आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा. यात तरुणाई त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करीत असतात. नुकत्याच आझादी का अमृत महोत्सव निमित्त कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या वैभवी अहिरराव हिने मिमिक्रीमध्ये आणि एकपात्री अभिनयात मनीष हटकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकांची कमाई केली.
तसेच, सेठ हिराचंद मुथा कॉलेज, कल्याणने आजोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत शुभम गोन्याल या विद्यार्थ्याने ओपन माईक आणि क्विझमध्ये प्रथम क्रमांक तसेच फोटोग्राफीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
त्यासोबतच विद्यार्थ्यांमधील विविध कला गुणांना वाव देण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी युथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या युथ फेस्टिवल मधील मिमिक्री स्पर्धत एसएसटी महाविद्यालयाच्या वैभवी अहिरराव या विदयार्थीनीने प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले. या विद्यार्थ्यांना हर्षल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी, उपप्राचार्या डॉ.खुशबू पुरस्वानी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर