डोंबिवली
पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित, चौथ्या पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन २०२२ सोहळ्याचे उद्घाटन पुस्तक प्रेमी अभिनेते अविनाश नारकर यांनी नुकतेच केले.
निसर्गात माणसे व झाडे ही सुद्धा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचे आदान प्रदान करीत असल्याचे मत अभिनेते नारकर यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांची पत्नी ऐश्वर्या डोंबिवलीकर आहे. डोंबिवली व मुंबईमधील हे आदान प्रदानच आहे. पूर्वी माणसाच्या हातात कोणते पुस्तक आहे त्यावरून त्याची किंमत केली जायची. आज मोबाईल ह्या खेळण्यामुळे पुस्तके मागे तर पडणार नाहीत ना ही भीती निर्माण होत असताना डोंबिवलीकर वाचक ती भीती खोटी ठरवीत आहेत. पुस्तकातील विचार हृदयात साठवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी, मंचावर लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै आणि ग्रंथाली विश्वस्तचे प्रभाकर भिडे उपस्थित होते. आकांक्षा मेहेंदळे यांनी आपल्या अनोख्या शैलीत सूत्रसंचालन केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर