कल्याण
पूर्वेतील साकेत महाविद्यालयाच्या कान्फरेन्स हॉलमध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची ‘सायबर अवेरनेस’ आणि बालकांसंदर्भात होणारे सायबर गुन्हे, शाळेची सुरक्षितता या विषयावर कोळसेवाडी पोलिसांनी गुरुवारी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये ‘सायबर अवेअरनेस’ बाबत सायबर गुन्ह्यांची माहिती देऊन सदरचे गुन्हे रोखण्यासाठी पत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली. तसेच, उपस्थितांना ‘१ कॅमेरा देशासाठी व समाजासाठी’ या उपक्रमाची माहिती देऊन होणारे गुन्हे रोखण्यासाठी व शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे महत्व समजावून सांगण्यात आले. आपल्या शाळा, महाविद्यालयाच्या आत व बाहेर रस्त्याच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर बैठकीत सहा. पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांचेसह सायबर व्याख्यानकर्ते उमाकांत चौधरी (अध्यक्ष, स्टडी वेव्हज एनजीओ कल्याण पुर्व) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कल्याण पूर्वेतील शाळा, महाविद्यालयातील सुमारे ४५ शिक्षक या बैठकीस उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर