डोंबिवली
मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असे आवाहन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी येथे केले.
सांस्कृतिक शहर डोंबिवलीत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली मनसे शहर शाखेतर्फे ‘एक दौड जवानांसाठी’ गेट वे ऑफ इंडिया, मुंबई ते डोंबिवली अशी ६५ किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती. या धावपटूचा सन्मान आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केले.
या दौडमध्ये ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू, डॉक्टर सहभागी झाले होते. रात्री १२ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून धावायला सुरुवात केली. डोंबिवली येथे सकाळी ९ वाजता पोहोचले. महिला व पुरुष मिळून सुमारे १०० जणांनी या दौडमध्ये सहभाग घेतला होता. यातून मिळणारा निधी हा जवानांना मदतीसाठी दिला जाणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर