December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

डोंबिवली : देशमुख होम्स येथील सोसायट्यांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार

डोंबिवली

मागील अनेक वर्षांपासून देशमुख होम्स येथील सोसायट्यांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर लवकरच कायमचा तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिले.
रविवारी देशमुख होम्स नारीशक्ती यांच्यासोबतच सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी, नागरिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू पाटील यांची भेट घेत या परिसरात असलेल्या विविध समस्यांबाबत निवेदन दिले. पाणी प्रश्नाबरोबरच, देशमुख होम्स इथल्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे आणि कचरा ग्राउंड हटविण्याबाबत आमदारांसोबत चर्चा केली. यावेळी, सर्व प्रश्न एकेक करून मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी या रहिवाश्यांना दिले. सर्वात पहिले पाण्याचा अनियमित वितरणाचा प्रश्न मार्गी लावू. पाण्याचा प्रेशर आणि नियमित पुरवठ्याबद्दल केडीएमसी तथा एमआयडीसी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील वाटचाल ठरविण्यात येणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितल्याची माहिती वंदना सिंह सोनावणे यांनी दिली.