कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका लंगडी असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन बुधवार, दि ३ मार्च २०२२ रोजी नेतीवली क्रिडांगण, शाळा क्रमांक १९ जवळ, कल्याण पूर्व या ठिकाणी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे.
लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून १८ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय लंगडी अजिंक्यपद स्पर्धा आयोजन दिनांक १२ व १३ मार्च २०२२ या कालावधीत डेरवण, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा संघ निवडण्यात येणार आहे. निवड चाचणीसाठी खेळणारा खेळाडू हा १ जानेवारी २००५ नंतर जन्मलेला असावा.
तरी सर्व महाविद्यालये, शाळा यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे कार्याध्यक्ष अविनाश नलावडे, सचिव प्रवीण खाडे व सहसचिव सुभाष गायकवाड यांनी केले आहे. यासाठी ८०९७१९१५७६, ९७३०८९६२६१ या क्रमांकावर संपर्क करावा.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी