December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मार्बल रस्त्यावर आल्याने ठाण्याकडे येणारी मार्गिका पूर्णपणे बंद

मार्बल रस्त्यावर आल्याने ठाण्याकडे येणारी मार्गिका पूर्णपणे बंद

ठाणे : घोडबंदर रोडवर ट्रेलर उलटला

ठाणे

राजस्थानवरुन अलिबाग येथे मार्बल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर रस्त्यावर उलटल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास गायमुख जकात नाका जवळ घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे येणारी मार्गिका बंद झाली होती. रविवारी वाहनांची वर्दळ कमी असल्याने वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. अडीच तासांनी ट्रेलर आणि त्यातील मार्बल बाजूला केल्यावर वाहतुक पूर्वपदावर आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ट्रेलर चालक माधवलाल भील हा उदयपूर, राजस्थान येथून सुमारे ३५ टन मार्बल घेऊन अलिबागला निघाला होता. ठाण्यातील घोडबंदर रोडने जाताना, दुपारी अडीजच्या सुमारास गायमुख जकात नाका येथे आल्यावर माधवलाल याचा ट्रेलरवरील ताबा सुटला आणि घोडबंदर रोडवरती ट्रेलर जाऊन उलटला. यावेळी ट्रेलरमधील मार्बल रस्त्यावर आल्याने घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे येणारी मार्गिका पूर्णपणे बंद झाली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, कासारवडवली पोलिस कर्मचारी व कासारवडवली वाहतूक पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

लर आणि रस्त्यावर पसरलेले मार्बल बाजूला करण्यासाठी २ क्रेन व १ जेसीबी पाचारण केले होते. त्यांच्या मदतीने ट्रेलर आणि मार्बल रस्त्याच्या बाजूला केल्यावर अडीच तासांनी वाहतुक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.