December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

डोंबिवली : भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

डोंबिवली 

दुकानात काम करत असताना भाजपच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या कार्यकर्त्यावर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात जमा झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कटके असे हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचे नाव आहे. त्याच्यावर कोणी हल्ला केला आणि हल्ल्यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती समजताच भाजप कार्यकर्त्यानी रुग्णालयात गर्दी केली होती. आमदार चव्हाण यांनी कटके यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडे माहिती घेतली. कटके यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी लवकरात हल्लेखोरांना अटक करावी अशी भाजपची मागणी आहे. – आमदार चव्हाण