कल्याण
जागतिक मराठी भाषा दिवस कल्याण पूर्वेतील ऑक्सिजन पार्क, गणेशवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मराठी शब्दकोडे स्पर्धा व मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी शब्दकोडे स्पर्धेत प्रथम क्रमांक योगेश बारसकर, द्वितीय क्रमांक प्रशांत भोसले, तृतीय क्रमांक नीलम व्यवहारे यांना मिळाला. तर, मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक भावना सुरळके, द्वितीय क्रमांक प्रांजल बागुल, तृतीय क्रमांक पियूष खरात यांना मिळाला. विजेत्या स्पर्धकांना रुद्राक्ष, कापूर व व्हिक्सची झाडे आकर्षक कुंडी सजावटीसह देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ वेळी माजी नगरसेविका सुमन निकम, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर गोळपकर, प्रशांत मोरे, सर्वात्मका सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय निरभवणे, विनोद धामणे, प्रशांत भोसले, मंगेश दुधाने, दिलीप पाटील, मनोज रोकडे, पंकज निकम आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित असल्याची माहिती मी कल्याणकर सामजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी दिली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर