December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

डोंबिवली : जुन्या आणि नव्या पिढीला जोडणारी MY बोली साजरी

डोंबिवली

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथसंग्रहालयातर्फे स्वररंग निर्मित ‘मराठी मनाचा कॅनव्हास. ‘MY बोली साजिरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विष्णू सोमण, सचिव सुभाष मुंदडा, सतीश कुलकर्णी हे पदाधिकारी  यावेळी उपस्थित होते. त्यांनी हा कार्यक्रम म्हणजे नव्या आणि जुन्या पिढीला जोडणारा दुवा आहे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात अभंग, ओव्या, कविता, म्हणी, उखाणे, गाणी, संतसाहित्य, पेहराव संस्कृती अशा मराठी संस्कृतीच्या वैशिट्यांचा अभिवाचनात्मक आविष्कार मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आला. अमेय रानडे, तपस्या नेवे, मेघा विश्वास, समीर सूमन या कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमाची संकल्पना मेघा विश्वास यांची होती. कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास सुप्रसिद्ध चित्रपट लेखक कौस्तुभ सावरकर, महेंद्र पाटील आणि लेखक आनंद पेंढारकर आवर्जून उपस्थित होते. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या पदाधिकारी शीतल दिवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.