December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : आरटीओ कार्यक्षेत्रात रिक्षा नुतनीकरणाच्या संख्येत वाढ

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पाठपुरावा मागणीला यश

कल्याण

कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात रिक्षा नूतनीकरणाची (पासिंग) संख्या वाढली असून कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मागणीला यश आले आहे. प्रलंबित रिक्षा नुतनीकरण काम जलदगतीने होण्यासाठी कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात दररोज अतिरिक्त ४० रिक्षाची नुतनीकरण होणार आहेत. याबाबत रिक्षा संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात रिक्षा योग्यता प्रमाणपञ नुतनिकरणासाठी आँनलाईन तारीख महीना दोन महिने विलंबाने मिळत होत्या. परिणामतः हजारो रिक्षाच्या नुतनीकरण विना प्रलंबित आहेत. यामुळे रिक्षा चालकांना नाहक मनस्ताप होत होता. आरटीओ वाहतुक पोलिस यांच्या तपासणी मोहिमेत रिक्षा चालकांना नाहक दंडात्मक आर्थिक भुर्दंड सोसण्याची शक्यता होती.

मुदत संपलेल्या रिक्षा जलदरित्या नुतनीकरण होण्यासाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या मागणीनुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी दररोज अतिरिक्त वाढीव ४० रिक्षा आँनलाईन तारीख स्लॉट वाढवुन दिलेला आहे. रिक्षा योग्यता प्रमाणपञ पासिंग जलद व विनाविलंब होण्याकरिता आँनलाईन तारीख शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही घेता येणार आहे.

ज्या रिक्षा चालकांची रिक्षाची नुतनीकरण मुदत संपली आहे. नुतनीकरण प्रलबितं आहे. त्यांनी त्वरित आँनलाईन रिक्षा नुतनीकरण तारीख घ्यावी असे रिक्षा चालकांना कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या जनसंपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.